Home Top News बर्म्युडा ट्रॅंगल रहस्यमय नाहीच: शास्त्रज्ञ

बर्म्युडा ट्रॅंगल रहस्यमय नाहीच: शास्त्रज्ञ

0

सिडनी (वृत्तसंस्था): उत्तर अटलांटिक समुद्रामधील बर्म्युडा ट्रॅंगल परिसरात रहस्यमय असे काहीही नसल्याचा दावा ऑस्ट्रेलियामधील एका शास्त्रज्ञाने केला आहे. या भागात रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेली विमाने आणि जहाजे यांची संख्या समुद्राच्या इतर भागात बेपत्ता झालेल्या विमाने आणि जहाजांच्या संख्येइतकीच आहे, असे या शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे.
डॉ. कार्ल क्रुस्झेनिकी असे या शास्त्रज्ञाचे नाव आहे. उत्तर अटलांटिक समुद्रातील बर्म्युडा बेट आणि फ्लोरिडा व प्युरो रिको या भागांना जोडणारा त्रिकोण हा बर्म्युडा ट्रॅंगल म्हणून ओळखला जातो. गेल्या सत्तर वर्षांपासून या सात लाख चौ. किमी भागात वीस विमाने अणि 50 जहाजे बेपत्ता झाली आहेत. मात्र समुद्राच्या या भागातून जहाज वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे जगाच्या पाठीवरील इतर समुद्रांमध्ये जहाजे आणि विमाने बेपत्ता होण्याच्या प्रमाणाइतकेच हे प्रमाण असल्याचा दावा कार्ल यांनी केला आहे. ही जहाजे अथवा विमाने बेपत्ता होण्यामागे मानवी चुका आणि खराब वातावरण ही कारणे असल्याचेही कार्ल यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version