Home Top News दहशतवादी हल्ला- पाच जवान शहीद, एका दहशतवाद्याला कंठस्नान

दहशतवादी हल्ला- पाच जवान शहीद, एका दहशतवाद्याला कंठस्नान

0

श्रीनगर, दि. 26-  दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील पोलीस लाईनवर शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले आहेत. यात राज्य पोलीस दलातील ३ पोलिसांचा तर सीआरपीएफच्या दोन जवानांचा समावेश आहे. तर या चकमकीत एका दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं असून ही चकमक अजूनही सुरू असल्याचं समजतं आहे.

दोन ते तीन दहशतवादी वसाहतीतील इमारतीत लपल्याचं बोललं जात आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार गोळीबार सुरू आहे. लष्कर घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांच्या कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलविलं जात आहे.

Exit mobile version