Home Top News चार दहशतवाद्यांना अटक

चार दहशतवाद्यांना अटक

0

इंफाळ ,दि.31(वृत्तसंस्था): राज्याच्या विविध भागांतून सुरक्षा दलांनी पाच जणांना अटक केली असून, त्यात चार दहशतवाद्यांचा समावेश आहे, असे पोलिसांनी आज येथे सांगितले. अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक बंदी घातलेल्या युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रन्ट आणि एक पूर्वी दहशतवादी कारवायात सक्रीय होता. या सर्वांना काल इम्फाळमधून अटक करण्यात आली, असे पोलिस अधिक्षक कबिब यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या यूएनएलएफच्या दहशतवाद्यांकडून बॅरल गन, डिमांड नोट्‌स आणि चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

Exit mobile version