
नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने देशभरातील विविध पोलिस सेवांमधील 967 अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पदके जाहीर केली आहेत. यात महाराष्ट्रातील 40 अधिकारी- कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रपतींचे पोलिस शौर्यपदक 25 जणांना जाहीर झाले आहे, तर 132 जणांना पोलिस शौर्यपदक देण्याची घोषणा झाली आहे. विशेष सेवेबद्दल 98 जणांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक आणि उल्लेखनीय सेवेबद्दल 712 जणांना पोलिस पदक जाहीर झाले आहे.
महाराष्ट्रातील पुरस्कारविजेते
राष्ट्रपतींचे पोलिस शौर्यपदक
1) हेड कॉन्स्टेबल गणपत नेवरू मडावी (मरणोत्तर)
पोलिस शौर्यपदक
1) पोलिस नाईक गिरधर नागो अत्राम (मरणोत्तर)
2) पोलिस उपअधीक्षक यशवंत अशोक काळे
3) उपनिरीक्षक प्रकाश व्यंकट वाघमारे
4) पोलिस नाईक सदाशिव लखमा मडावी
5) पोलिस नाईक गंगाधर मदनय्या सिदाम
6) कॉन्स्टेबल मुरलीधर सखाराम वेलाडी
7) उपनिरीक्षक अतुल श्रावण तलवडे
8) उपनिरीक्षक अंकुश शिवाजी माने
9) पोलिस नाईक विनोद मेस्सो हिचामी
10) कॉन्स्टेबल सुनील तुकडू मडावी (मरणोत्तर)
11) पोलिस नाईक इंदरशाह वासुदेव सादमेक
12) सहायक निरीक्षक राजेंद्रकुमार परमानंद तिवारी
13) उपनिरीक्षक संदीप अंशाबापू म्हस्के
14) उपनिरीक्षक अविनाश अरुण गडाख
15) हेडकॉन्स्टेबल रमेश कोल्हुजी येडे
16) पोलिस नाईक वामन सहदेव पारधी
17) पोलिस नाईक राधेश्याम सीताराम गाते
18) पोलिस नाईक उमेश भगवान इंगळे
19) अधीक्षक मोहम्मद सुवेझ मेहबूब हक
विशिष्ट सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक
1) के. एल. बिश्नोई, अतिरिक्त पोलिस महासंचालक, कायदा सुव्यवस्था, मुंबई
2) संजय बर्वे, अतिरिक्त पोलिस महासंचालक, रेल्वे, मुंबई
3) अशोक बागमारे, असिस्टंट कमांडंट, राज्य राखीव पोलिस दल, नागपूर
4) राजन पाली, उपअधीक्षक, फुलगाव डिव्हिजन, वर्धा
5) सदाशिव पाटील, हेडकॉन्स्टेबल, क्राईम ब्रांच, कोल्हापूर
उल्लेखनीय सेवेबद्दल पोलिस पदक
1) सुरेशकुमार मेकाला, पोलिस आयुक्त, अमरावती
2) शशिकांत माने, पोलिस अधीक्षक, प्राचार्य पीटीएस, नागपूर
3) माधव कारभारी, सहायक अधीक्षक, बीड
4) निताराम कुमारे, सहायक आयुक्त, विशेष शाखा, नागपूर शहर
5) बळिराम कदम, सहायक आयुक्त, गुन्हे शाखा, सीआयडी, मुंबई
6) छगन देवराज, उपअधीक्षक, पोलिस मुख्यालय, नाशिक ग्रामीण
7) सोपान पवार, निरीक्षक, विधानभवन सुरक्षा व्यवस्था, मुंबई
8) प्रदीप सुर्वे, पोलिस निरीक्षक, जातपडताळणी समिती, नवी मुंबई
9) ज्ञानदेव गवारे, निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव
10) गौतम गडमाडे, सशस्त्र पोलिस निरीक्षक, राज्य राखीव पोलिस दल, अमरावती
11) बळिराम जीवतोडे, पोलिस निरीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर
12) सुरेश भोयर, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, गोंदिया
13) पंडित पवार, पोलिस उपनिरीक्षक, सिन्नर पोलिस ठाणे, नाशिक ग्रामीण
14) शिवाजी धुरी, सशस्त्र पोलिस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलिस दल, पुणे
15) दामोदर सिंह, सशस्त्र पोलिस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलिस दल, नागपूर
कारागृहांमधील कर्मचाऱ्यांसाठीही सुधारक सेवा पुरस्कारांची घोषणा झाली आहे.
महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते
1) रवींद्र राम पवार, हवालदार, जाधव जेल ऑफिसर्स ट्रेनिंग कॉलेज, येरवडा, पुणे
2) तात्यासाहेब सदाशिव निंबाळकर, जेलर ग्रेड – 2, येरवडा केंद्रीय कारागृह, पुणे
3) संजीत रघुनाथ कदम, हवालदार, येरवडा केंद्रीय कारागृह, पुणे
4) दिगंबर सदाशिव विभूते, शिपाई, कोल्हापूर जिल्हा कारागृह