Home Top News 29 नोव्हेंबरला दोषींच्या शिक्षेचा होणार फैसला

29 नोव्हेंबरला दोषींच्या शिक्षेचा होणार फैसला

0

अहमदनगर,दि.22 : कोपर्डी बलात्कार हत्या प्रकरणातील दोषींनी अमानुष कृत्य केल्याने त्यांना फाशीची शिक्षाच योग्य राहील. कोपर्डी खटल्यातील दोन दोषी हे प्रत्यक्ष बलात्काराच्या घटनेत सहभागी नसले, तसा पुरावा नसला तरी ते या घटनेच्या कटात सहभागी असल्याने ते मुख्य दोषीसह फाशीच्या शिक्षेस पात्र आहेत, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केला. दोषींना २९ नोव्हेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

सरकारी पक्षाच्यावतीने युक्तिवाद करतान निकम म्हणाले, ११ ते १३ जुलै २०१६ दरम्यान बलात्कार व हत्येचा कट दोषींनी रचला. ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता पीडित मुलगी व तिच्या मैत्रीणीला रस्त्यात अडविले. दोषी क्रमांक एक जितेंद्र शिंदे याने पीडित मुलीचा हात खेचला.  बलात्काराच्या उद्देशाने रस्त्याच्या कडेला नेले. दोषी नितीन भैलुमे व संतोष भवाळ हे त्यावेळी विकट हास्य करत जितेंद्र शिंदेच्या कृत्याचा आनंद लुटत होते. त्यावेळी दोघांनीही जितेंद्र शिंदेला नंतर काम उरकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दोन दिवस पीडितेवर जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे, संतोष भवाळ हे पाळत ठेवत होते. पीडित मुलगी १३ जुलैला सायंकाळी ७ वाजता पीडित मुलगी मसाला आणण्यासाठी जात होती. पीडित मुलगी परत न आल्याने आई-वडिलांनी शोध घेतला. त्यावेळी रस्त्याच्या कडेला सायकल दिसली. त्यावेळी शेतातच मुलीचे प्रेत सापडले. मुलीचे हात निखळून पडले, गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती. दोषींनी नियोजनपूवर्क ही हत्या केली. यात जितेंद्र शिंदेला नितीन भैलुमे, संतोष भवाळ यांनी साथ दिली, असे सांगत निकम यांनी तिघांनाही फाशीची शिक्षाच योग्य राहील, असे सांगितले.

Exit mobile version