Home Top News व्होडाफोन डेटा सक्षम नेटवर्क वापरा आता महाराष्ट्रातील ७ हजारांहून अधिक गावांत

व्होडाफोन डेटा सक्षम नेटवर्क वापरा आता महाराष्ट्रातील ७ हजारांहून अधिक गावांत

0

व्होडाफोन सुपरनेट ४जी डेटा सक्षम नेटवर्क आता भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात १५ तहसीलमधील २९० हून अधिक गावांमध्ये उपलब्ध

भंडारा/गोंदिया,दि.20ः-, व्होडाफोन सुपरनेट ४जी हे डेटा सक्षम नेटवर्क आता महाराष्ट्र आणि गोव्यातील ३५ जिल्ह्यांतील ७००० गावांत पोहोचले असल्याचे व्होडाफोन या भारतातील आघाडीच्या दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीने आज घोषित केले. परिमंडळातील दोन कोटींहून अधिक ग्राहकांची डेटा आणि व्हॉइस सेवेची मागणी पूर्ण करण्यासाठी व्होडाफोनने आपले नेटवर्क विस्तारले असून, ९२०० हून अधिक साइट्स (०१ साइट प्रति तास) उभारल्या आहेत.
महाराष्ट्र आणि गोव्यातील नागरिकांना व्होडाफोन सुपरनेट ४जी परिवाराचा भाग होण्याचे आवाहन करून व्होडाफोन इंडियाच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे व्यवसाय प्रमुख आशिष चंद्रा म्हणाले, ‘महाराष्ट्र आणि गोव्याच्या शहरी, तसेच ग्रामीण भागात डेटाच्या वापरात वेगाने वाढ होत असल्याचे आमचे निरीक्षण आहे. या दोन्ही राज्यांतील आमच्या लाखो ग्राहकांच्या या वाढत्या मागणीच्या वेगाबरोबर राहण्यासाठी आम्ही नेटवर्क विस्ताराला चालना दिली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही अतिरिक्त क्षमता निर्माण केली आहे, तसेच स्मार्ट, अवाढव्य आणि मजबूत डेटा सक्षम नेटवर्क उभारले आहे.ङ्क
विविध वैशिष्ट्यांचा समावेश असलेली व्होडाफोन उत्पादने आणि योजनांबाबत बोलताना आशिष चंद्रा म्हणाले, ‘पोस्टपेड आणि प्रीपेड प्रकारांत आम्ही उत्तम प्रकारची उत्पादने देत असून, त्यामध्ये भरपूर लाभ आहेत, तसेच या योजना परवडणा-या आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांना व्होडाफोन सुपरनेट ४जी डेटा सक्षम नेटवर्क वापरण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. त्यासाठी हँडसेट उत्पादकांशी भागीदारी केली असून, यामध्ये विविध किंमत श्रेणींतील वैविध्यपूर्ण ४जी स्मार्टफोन आणि त्याबरोबर रोख परताव्यासारख्या योजनाही देत आहोत. डेटाचे लोकशाहीकरण करणे आणि ४जीची उपलब्धता अधिकाधिक वाढविणे या आमच्या धोरणाचाच हा भाग आहे. आमचे ग्राहक जसजसे डिजिटल आणि डेटा स्नेही होतील, तसतसे आम्ही त्यांना सर्वोत्तम सेवा आणि अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञान, उत्पादने व सेवा यांतील गुंतवणूक वाढवतो आहोत.ङ्क

Exit mobile version