Home Top News बॉम्बने पिंपरीतील कार्यालये उडवण्याची धमकी

बॉम्बने पिंपरीतील कार्यालये उडवण्याची धमकी

0

पुणे – निनावी पत्राद्वारे आळंदी नगरपरिषद, जलशुद्धीकरण केंद्र, एमएसईबी कार्यालय आणि शाळा बॉम्बने उडविण्याची तसेच महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही जिवे मारण्यात येईल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेत निनावे आलेल्या या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. नगरपरिषदतर्फे शहरात मुलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याचा राग मनात धरुन कोणीतरी हे पत्र पाठवले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस स्थानकात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version