Home Top News उच्च न्यायालयाने कायम ठेवली चौटाला पिता-पुत्राची शिक्षा

उच्च न्यायालयाने कायम ठेवली चौटाला पिता-पुत्राची शिक्षा

0

नवी दिल्ली – आज हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला आणि त्यांचे पुत्र अजय चौटाला यांना दिल्ली उच्च न्यायालयाने २००० सालच्या बेकायदेशीर शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी सुनावण्यात आलेल्या १० वर्षाची शिक्षा कायम ठेवली आहे.

या घोटाळ्याप्रकरणी चौटाला यांना न्यायाधीश सिध्दार्थ मृदील यांनी सुनावणी दरम्यान अधिक जबाबदार धरले आहे. याशिवाय या प्रकरणातील शेर सिंग बदश्मी, विजय धर आणि संजय कुमार या तिघांना सुनावण्यात आलेली १० वर्षाची शिक्षाही कायम ठेवण्यात आली आहे. या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व ५५ याचिका कोर्टाने फेटाळल्या आहेत.

Exit mobile version