Home Top News कोंबडपार जंगलातील चकमकीत एक नक्षली ठार

कोंबडपार जंगलातील चकमकीत एक नक्षली ठार

0

गडचिरोली,दि.१६: कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलिस पोलिस मदत केंद्रांतर्गत कोंबडपार-गुरियालदंड जंगलात आज सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे.विशेष अभियान पथकाचे जवान आज सकाळी कोंबडपार-गुरियालदंड जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युतर देताच नक्षली जंगलात पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता एका नक्षल्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी नक्षल्याचा मृतदेह, एक रायफल व अन्य नक्षल साहित्य ताब्यात घेतले आहे.  मृत नक्षली पुरुष आहे. परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले

Exit mobile version