Home Top News शिकार करुन टाकला बांपेवाड्याच्या तलावात बिबट्याचा मृतदेह

शिकार करुन टाकला बांपेवाड्याच्या तलावात बिबट्याचा मृतदेह

0

गोंदिया,दि.23ःःभंडारा जिल्ह्यातील लाखनी वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येत असलेल्या बांपेवाडा(एकोडी) येथील एका तलावात आज सकाळच्या सुमारास बिबट्याला मारुन फेकल्याची घटना उघडकीस आली आहे.सदर क्षेत्र हा न्यु नागझिरा-नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाला लागून अाहे.सदर प्रकरणाची माहिती काल सोमवारला सायकांळच्या सुमारास लाखनी वनपरिक्षेत्राधिकारी यांना मिळाली.त्यानंतर त्यांनी तपास कार्याला सुरवात केली असता बापेंवाडा येथील एका इसमाने आपणच तलावात बिबट्याचा मृतदेह फेकल्याची कबुली दिली.सदर इसमाने रानडुकराची शिकार करण्यासाठी शेतशिवारात विजेच्या ताराचा प्रवाह सोडलेला होता.परंतु त्यामध्ये रानडुकर न येता बिबट आल्याने सदर इसमाने मृत बिबट्याला तलावात फेकून दिले होते तो मृतबिबट आज तलावात बाहेर काढण्यात आला.सदर इसमाला लाखनीच्या वनपरिक्षेत्राधिकारी यांनी ताब्यात घेतले असून तपास कार्य सुरु असल्याची माहिती वरिष्ठांनी बेरार टाईम्सला दिली.याप्रकाराबद्दल वन्यप्रेमी तसेच सेवानिवृत्त वनअधिकारी यांनीही निषेध नोंदविला आहे.

Exit mobile version