Home Top News नक्षलवाद्यांच्या गोळीबारात दूरदर्शनच्या कॅमेरामनचा मृत्यू; दोन जवान शहीद

नक्षलवाद्यांच्या गोळीबारात दूरदर्शनच्या कॅमेरामनचा मृत्यू; दोन जवान शहीद

0

दंतेवाडा(वृत्तसंस्था)दि.30 -छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे. हल्ल्यातील गोळीबारात दूरदर्शनच्या कॅमेरामनला गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोरखनाथ बघेल यांनी या हल्ल्याची पुष्टी केली असूून चौकशी करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. पोलीस दलातील पोलीस रुद्रप्रताप आणि दूरदर्शनचा कॅमेरामन अचुत्यानंद साहू यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी दूरदर्शनच्या कॅमेरामनचा गोळीबारात मृत्यू झाल्याच्या बातमीस दुजोरा दिला आहे. तसेच नक्षलवाद्यांनी कॅमेरा सुद्धा आपल्यासोबत घेऊन गेल्याचे वृत्त आहे. अजूनही नक्षलवाद्यांचा हल्ला सुरु आहे. पोलीस अधिकारी घटनेची माहिती मिळवत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीवर बहिष्कार घालण्यासाठी नक्षलवाद्यांनी डोके वर काढले असल्याची चर्चा आहे. दंतेवाडा येथे विधानसभा निवडणुकीचे वार्तांकन करण्यास गेलेल्या दूरदर्शन या सरकारी वाहिनीच्या पथकावर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात कॅमेरामन आणि दोन दोन जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर दूरदर्शनचे पथक नक्षलप्रभावीत क्षेत्रातील दंतेवाडा येथे गेले होते. दंतेवाडा येथील अरणपूर जंगलात हा हल्ला झाला.

Exit mobile version