बीड,दि.08- बीड-माजलगाव-परभणी या राज्य महामार्गावर पवारवाडीजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पवारवाडीजवळील गॅस गोडाऊनसमोर हा अपघात झाला. या अपघातात एक गंभीर जखमी झाला आहे.
माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील सोळंके कुटुंबातील चौघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. दयानंद गणेश सोळंके (48), संगीता दयानंद सोळंके (42), राजनंदनी दयानंद सोळंके (12), प्रतिक दयानंद सोळंके(9) असे मृतांची नावे आहेत. बब्बू असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो गॅरेज मॅकॅनिक आहे.दयानंद सोळंके हे एचडीएफसी बॅंकेत सेक्युरिटी गार्ड होते. गंगामसला येथील गणरायाच्या ते दर्शनासाठी सहकुटुंब गेले होते. गणरायाचे दर्शन घेऊन ते परतत असताना हा भीषण अपघात झाला.