Home Top News काठीच्या वापराबाबत RSS च्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा

काठीच्या वापराबाबत RSS च्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा

0

नागपूर ,दि. ०२ : – काठीचा वापर हा गुन्हा असताना आणि त्याबाबत नागपुरात तक्रार दाखल केली असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांवर अद्यापही गुन्हे दाखल होत नाहीत. या विरोधात आपण लोकशाही मार्गाने लढा देऊ आणि पोलिसांना कारवाईस भाग पाडू, असा इशारा माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केला.

खोपडे नागपुरात आयोजित पद्धकार परिषदेत म्हणाले, 18 ऑक्टोबर 2018 रोजी संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात स्वयंसेवकांनी लाठी हाती बाळगून मिरवणूक काढली. भादंविच्या कलम 153 (अ) नुसार हा दखलपात्र गुन्हा आहे. त्याचप्रमाणे संघाने असुरी शक्तींच्या विनाशाची घोषणा आपल्या कार्यक्रमात केली आहे. संघाच्या दृष्टीने असुरी शक्ती म्हणजे आधुनिक विचार बाळगणारे, डावे, अंधश्रद्धा ‍विरोधी कार्यकर्ते वा पुरोगामी लोक आहेत. त्यासाठी संघाने असुरी शक्तींचा नाश करण्यासाठी बेकायदा शस्त्रांचा मोठा साठा केला आहे. या विरोधात आपण रितसर तक्रार नागपूर पोलिसांकडे केली आहे. त्यात आरोपी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व संघाचे प्रमुख मोहन भागवत व इतरांचा समावेश आहे. 19 नोव्हेंबर रोजी नागपुरातील कोतवाली पोलिस ठाण्यातही तक्रार दिली. मात्र, ती दाखल करण्यात आली नाही. गुन्हा दाखल न करण्याबाबत नागपूर पोलिसांवर दबाव असल्याने आपण पोलिस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनाही भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आपली भेट टाळण्याचा सातत्याने प्रयत्न केला. नागपूर पोलिसांच्या या नाकर्तेपणाबद्धल आपण जाब विचारणार आहोत. आपण लोकशाही मार्गाने या विरुद्ध लढा देऊ, असा इशाराही खोपडे यांनी यावेळी दिला.

You Might Als

Exit mobile version