Home Top News एटापल्लीजवळ ट्रक आणि बसची भीषण धडक; पाच ठार

एटापल्लीजवळ ट्रक आणि बसची भीषण धडक; पाच ठार

0

गडचिरोली,दि.16: आज बुधवारी सकाळच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीपासून पाच किमीवरील गुरुपल्ली गावाजवळ अहेरी डेपोच्या बस आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन त्यात पाच जण ठार झाल्याची घटना घङली. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की बस आणि ट्रकच्या दोन्ही केबिन्सचा चुराडा झाला. या बसमध्ये काही प्रवासी अडकल्याचे समजते. सकाळच्या वेळेस निघालेली ही बस शाळकरी विद्यार्थ्यांनी अधिक भरली होती.जखमीवर एटापल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version