Home Top News अपरिहार्य कारणास्तव ग्रामपंचायत निवडणुका स्थगित

अपरिहार्य कारणास्तव ग्रामपंचायत निवडणुका स्थगित

0

मुंबई – राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या ८ हजार १०८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांपैकी ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१५ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. उर्वरित मे ते जुलै २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि सर्व पोटनिवडणुका पूर्वनियोजनाप्रमाणे २२ एप्रिल २०१५ रोजीच होतील. तर स्थगित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका यथावकाश जाहीर करण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.

सहारिया यांनी सांगितले, की जून ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा असल्यामुळे त्यावेळी निवडणुकांसाठी पुरेसे पोलिसबळ उपलब्ध होऊ शकणार नाही. तसेच केंद्राकडून राज्याला मिळणारे अर्धसैनिक दलदेखील मिळणार नाही. त्यामुळे त्या कालावधीत निवडणुका घेऊ नयेत, अशी पोलिसांकडून विनंती करण्यात आली होती. म्हणून मे ते जुलैसोबतच ऑगस्ट व सप्टेंबर २०१५ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्याही निवडणुका २२ एप्रिल २०१५ रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Exit mobile version