Home Top News जहाल नक्षली नर्मदाक्काचे पतीसह तेलगंणा पोलिसासमोर आत्मसमर्पण?

जहाल नक्षली नर्मदाक्काचे पतीसह तेलगंणा पोलिसासमोर आत्मसमर्पण?

0

गोंदिया/गडचिरोली,दि.११:तेलगंणा व आंध्रप्रदेशसह महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली,गोंदिया जिल्ह्यातील नक्षल चळवळीत प्रमुख स्थान असलेली जहाल नक्षली नर्मदाक्का हिने तिचा पती किरणकुमार याच्यासह तेलगंणा पोलिसापुढे आत्मसर्मपण केल्याचे वृत्त असून तेलगांणा पोलिसांनी त्यांना गडचिरोली पोलीसांकडे सुपुर्द केल्याची विश्वसनीय माहिती आहे.या संदर्भात पोलीस विभागाने अद्यापही अधिकृत माहिती दिलेली नसली तरी गोंदिया पोलीस मुख्यालयात नर्मदक्कावर कुठले कुठले गुन्हे आहेत याचा तपास सुरु करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

वयाची पासष्टी पूर्ण केलेली नर्मदाक्का उर्फ अल्लुरी उषा राणी ही आंध्रप्रदेशातील गुरवडा येथील मूळ रहिवासी असून, २५ वर्षांहून अधिक काळापासून नक्षल चळवळीत आहे. दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य असलेली नर्मदाक्का ही डीकेएएमएसची इन्चार्ज होती. एके-४७ हे शस्त्र वापरणारी नर्मदाक्का हिच्याच नेतृत्वात जिल्ह्यातील बहुतांश नक्षली आजवर काम करीत होते. येथे आजवर झालेल्या अनेक जाळपोळी व हत्यांची मास्टर माईंड नर्मदाक्का हीच होती. राज्य शासनाने तिच्यावर सुमारे २५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

नर्मदाक्का चळवळीत आल्यानंतर किरणकुमार याच्याशी तिचा विवाह झाला. परंतु दोघांची भेट फारच कमी व्हायची. किरणकुमार हादेखील दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य होता. तसेच दंडकारण्य पब्लिकेशन टीमचा इन्चार्ज होता. ९ एमएम पिस्टल हे शस्त्र वापरायचा.

दोघांना काल तेलंगणातून गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्रीच त्यांना अहेरी व नंतर गडचिरोली येथे आणण्यात आले, अशी चर्चा आज दिवसभर होती. मात्र, काहींच्या मते दोघांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. यासंदर्भात पोलिसांनी अधिकृतरित्या काहीही सांगितले नसले; तरी  नर्मदाक्का व किरणकुमार हे दोघेही पोलिसांच्या ताब्यात असल्याच्या बातमीला दुजोरा पोलीस प्रशासनाने दिला आहे

Exit mobile version