Home Top News राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता

राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता

0

वृत्तसंस्था
नवी दिल्ली – गुप्तचर विभागाने राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता वर्तविली असून दिल्ली पोलिसांनी दक्षतेचे निर्देश देण्यात आले आहेत.
अलिकडेच जम्मू-काश्‍मीरमध्ये झालेल्या “फियादीन‘ सारखा हल्ला राजधानी दिल्लीमध्येही होऊ शकतो असे गुप्तचर विभागाने म्हटले आहे. यामुळे दिल्ली पोलिसांना दक्षतेचे निर्देश देण्यात आले आहेत.
सुरक्षा संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना दिल्लीत “फियादीन‘ हल्ला करण्याची शक्‍यता आहे. तसेच दिल्लीसह दिल्लीच्या सीमारेषा आणि देशाच्या संवेदनशील सीमारेषेवरही दक्षतेचे निर्देश देण्यात आले आहेत. मार्चमध्ये जम्मू-पठाणकोट महामार्गावर सांबा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्करी छावणीवर हल्ला केला होता. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. या हल्ल्यातील दहशतवाद्यांकडे ग्रॅनाईडसह स्वयंचलित शस्त्रेही आढळून आली होती. त्यामुळे राजधानी दिल्ली पोलिसांना आवश्‍यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत सूचित करून दक्षतेचे निर्देश देण्यात आले आहेत.

Exit mobile version