Home Top News नांदेड,यवतमाळ जिल्ह्यातील सीमावर्तीभागात भूकंपाचे सौम्य धक्के

नांदेड,यवतमाळ जिल्ह्यातील सीमावर्तीभागात भूकंपाचे सौम्य धक्के

0

यवतमाळ,दि.21 : जिल्ह्यातील मराठवाडाच्या सीमावर्ती भागात शुक्रवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास 8 ते 10 सेकंद 3.9 रिक्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.दरम्यान जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी  उमरखेड तालुक्यातील ढाणकी व परिसरातील गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती नुकतीच मिळाल्याचे सांगितले.या माहितीची प्रशासनाकडून वास्तविकता काय आहे हे तपासले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आर्णी तालुक्याच्या सावळी सदोबा येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, सावळीपासून एक किलोमीटर अंतरावरील चिचबर्डी-बारभाई, सावळी सदोबा, इचोरा, माळेगाव, पुरुषोत्तमनगर, वरुड (तुका), उमरी आदी गावात भूकंपाचे धक्के जाणवले. टीव्ही पाहणाºया, बाहेर झोपलेल्या नागरिकांनी हे धक्के अनुभवले. टीव्हीवरील फ्लॉवर प्लॉट पडणे, घरातील भांडे पडणे, बंद पंखे हालणे, घर हलणे आदी बाबी नागरिकांना जाणवल्या. चिचबर्डी परिसर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आहे. याच भागातील अंजनखेड, राणीधानोरा, गोंडवडसा, साकूर, कवठा बाजार, कोसदनी, अंबोडा येथेसुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्याने गावातील नागरिकांनी भीतीने रस्त्यावर धाव घेतली.मराठवाडा सीमेवरील बहुतांश तालुक्यातील गावांमध्ये हे धक्के जाणवले आहे. महागाव तालुक्यातील करंजखेड, कासारबेहळसह सहा गावांमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे.

Exit mobile version