Two laborers killed by submerging under the rail tracks | रेल्वे रूळाखाली दबून दोन मजूर ठार 
गोंदिया,दि.२३ : गोंदिया-बालाघाट रेल्वे मार्गावर पाईप व केबल टाकण्याचे काम करीत असताना माती खचल्याने त्याखाली दबून दोन मजूर ठार तर एक मजूर गंभीर जखमी झाला. ही घटना आज रविवारी (दि.२३) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गोंदिया रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर घडली.मृत मजुरामध्ये  राजेश देवलाल शरणागत (३५) आणि अंकर पंधरवार (३५) ,रा.शिवनी, रावणवाडी यांचा समावेश आहे. तर चंद्रविलास शहारे (२५) रा.लहीटोला, असे जखमी मजुराचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्प्माहितीनुसार येथील रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ पासून काही अंतरावर रूळाखाली पाईप व केबल टाकण्याचे काम सुरू आहे. या कामावर चार मजूर कार्यरत होते. मात्र हे काम करीत असताना शेजारच्या रूळावरून गाडी गेल्याने जमिनीत कंपन झाले आणि रूळाखाली पॉर्इंट टाकण्यासाठी जागा बनविण्यासाठी असलेले मजूर त्या माती व गिट्टीखाली दबले. यात राजेश शरणागत व अंकर पंधरवार जागीच ठार झाले. तर चंद्रविलास शहारे हा गंभीर जखमी झाला. त्यांच्या सोबत काम करीत असलेल्या चौथा मजूर सुदैवाने बचावला. त्यानेच याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली.