Home Top News मालेगावची दोन मुले पूर्णगड खाडीत बुडाली

मालेगावची दोन मुले पूर्णगड खाडीत बुडाली

0

रत्नागिरी- रत्नागिरी तालुक्‍यातील पूर्णगड येथील खाडीत पोहण्यासाठी उतरलेले दोघेजण मंगळवारी बुडाले. यापैकी एकाचा मृतेदह सापडला असून दुस-याचा शोध सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून काही मुले रत्नागिरी येथील पावस येथे सहलीसाठी आली आहेत. त्यातील अब्दुल्ला हाजिम इम्रान (१८) आणि मोहम्मद आवेश शहजाद अहमद (१७)ही दोन मुले इतरांना न सांगता पोहण्यासाठी गेले होते.
मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले. त्यातील आवेश शहजाद अहमद याचा मृतदेह सापडला असून दुस-याचा शोध सुरू आहे.

Exit mobile version