Home Top News मुलाच्या लग्नासाठी अरूण गवळीला पॅरोल मंजूर

मुलाच्या लग्नासाठी अरूण गवळीला पॅरोल मंजूर

0

नागपूर, – कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी याचा मुलाच्या लग्नासाठी उपस्थित राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून गवळीला १५ दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. अरूण गवळीचा पॅरोलचा अर्ज काही दिवसांपूर्वी नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सोमवारी अरूण गवळीकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पॅरोलसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने २०१२ मध्ये अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, १६ मार्च २०१५ रोजी त्याची रवानगी मुंबईवरून नागपूरच्या कारागृहात करण्यात आली होती. नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या अरुण गवळीच्या मुलाचा ९ मे रोजी मुंबईला टर्प क्लब मेंबर्स एनक्लोसर रेसकोर्स, महालक्ष्मी या ठिकाणी विवाह समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्या समारंभाला त्याला जायचे असल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे पॅरोलवर जाण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, गवळी कारागृहाच्या बाहेर आला, तर साक्षीदाराच्या जीवाला धोका निर्माण होईल, असा अहवाल गृहखात्याने दिल्यामुळे विभागीय आयुक्तांनी हा पॅरोल अर्ज फेटाळला होता.

Exit mobile version