यवतमाळच्या दोघासंह कोरोना रुग्णांची संख्या 6 वर

0
174

नागपूर,दि.14: कोरोनाचे संशयित म्हणून दाखल झालेल्या तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडून आता ६ वर पोहचली आहे. याआधी तीन रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. शनिवारी नव्याने पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या तीन रुग्णांमध्ये एक नागपुरातील तर दोघेजण यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत.कोरोना पिडितांच्या संख्येत दिवसागणिक भर पडताना दिसत आहे. शुक्रवारी यवतमाळहून आलेल्या ९ संशयितांचे तर नागपुरातील ४ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते.त्यापैकी तीन जण पॉझिटिव्ह असल्याचा ताजा अहवाल आला आहे.दरम्यान नागपुरात प्रशासनाने खबरदारीचे सर्व उपाय योजण्यावर कंबर कसली आहे.याआधी अमेरिकेहून आलेल्या एका गृहस्थांचा अहवाल सर्वात प्रथम पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांची पत्नी व नातेवाईक हे दोघेही पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते.तर गोंदियातील संशयीताचे नमुने निगेटिव्ह आले आहे.