जनता कर्फ्यू : महाराष्ट्र ठप्प,राज्यात कोरोनाचा दुसरा बळी

0
620

गोंदिया,दि.22 :पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्याप्रमाणे देशभरात जनता कर्फ्यू लागू झाला आहे. राज्यातही कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. 14 तासांच्या जनता कर्फ्यूला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली, परंतु राज्यभरातून मिळालेली छायाचित्रे पाहिल्यानंतर असे दिसते की शनिवारपासून कर्फ्यू लागू होताना दिसून आला. राज्यातील जवळपास सर्वच शहरे लॉकडाउन आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद आहे. बहुधा देशाच्या इतिहासात प्रथमच लोकांनी स्वत: कर्फ्यूसाठी तयारी केली आणि त्याची अंमलबजावणीही करीत आहेत.राज्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला असून , मुंबईतील ५६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा ६४ वरुन ७४ वर गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्याही वाढली आहे. ५६ वर्षीय व्यक्तीचा मुंबईतल्या खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.विशेष म्हणजे या व्यक्तीला कालच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र आज त्यांचा मृत्यू झाला आहे. 1राज्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्याही ७४ झाली असून, दिवसभरात १० रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाचे पुण्यात २, मुंबईत ८, यवतमाळ व कल्याणमध्ये प्रत्येकी १ असे १२ नवीन रुग्ण शनिवारी आढळले होते. त्यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ६४ झाली होती. तर आता आणखी नव्या १० रुग्णांची नोंद झाली आहे.

गोंदिया रेल्वे स्थानकावर आज असे शांत होते.

गोंदिया जिल्ह्यातील जनतेने त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिलेला आहे.व्यापारी प्रतिष्ठाने आणि इतर दुकाने सर्व बंद ठेवण्यात आली आहेत.भाजीबाजारासह औषधांचेही दुकाने आज बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यावर शुकशुकाट बघावयास मिळाले.गोंदियातील मुख्य बाजारपेठी,जयस्तंभ चौक,फुलचूर नाका,अवंतीबाई चौक, कुडवा नाका परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले असून मुख्य रस्तावरील वाहतुकही ओसरली आहे. गावखेड्यातही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.हैद्राबादवरुन आलेल्या बालाघाट येथील नागरिकांनी साधन न मिळाल्याने बालाघाट रिंगरोडवरील चौकातील एका दुकानात आश्रय घेण्याची वेळ आली.त्यासंदर्भात जिल्हाप्रशासनाला माहिती देण्यात आली.

पवनी येथील बंद बाजारपेठ

वर्धा रेल्वेस्थानकावर एरव्ही मोठी गर्दी असते. मात्र रविवारी सकाळी तिथे चिटपाखरूही नव्हते. वंजारी चौक, आरती चौक, बसस्थानकावरही सर्वत्र शांतता होती.एरवी सतत गजबजून राहणा?्या गडचिरोलीमधील इंदिरा गांधी चौकात आज असा शुकशुकाट आहे. एखाद्या दुचाकीचा अपवाद सोडता कोणीही रस्त्याने फिरताना दिसत नाही. गडचिरोली शहरच नाही तर संपूर्ण जिल्हाभरात नागरिकांनी अशा पद्धतीने संपूर्ण व्यवहार अभूतपूर्व बंद ठरवून जनता कर्फ्युच्या आवाहनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.

यवतमाळ  जिल्ह्यात लाँक डाऊन. रस्ते निर्मनुष्य. जनता कर्फ्यूला प्रतिसाद आहे.  यवतमाळ; वणी; उमरखेड; आर्णी; महागाव; दारव्हासह सर्वच तालुक्यात शुकशुकाट आहे.

भंडारा शहरातही मुख्य बाजारपेठेसह सर्व भागात शांतता होती. कुणीही बाहेर पडत नव्हते. राष्ट्रीय महामार्गावरची वर्दळ पूर्णपणे थांबलेली होती.पवनी,तुमसर,साकोली,लाखांदूरसह सर्वच तालुक्यात बंदचा प्रभाव आहे.पोहरा,सिहोरा,सानगडीसारख्या मोठ्या गावामध्येही नागरिकांनी प्रतिसाद दाखविला आहे.

अहेरी येथील बंद बाजारपेठ

चंद्रपुरातील एरव्ही नेहमीच गजबजलेल्या गांधी चौक, गिरनार चौक, जटपुरा गेट, ज्युबिली हायस्कूल चौक, बंगाली कॅम्प चौक, प्रियदर्शिनी चौक आणि वरोरा नाका चौकात शुकशुकाट होता.

अमरावतीच्या राजकमल चौक, इर्विन चौक, राजापेठ, गाडगेनगर , पंचवटी कटोरा नाका आदी भागात नागरिकांनी कडकडीत बंद पाळल्याचे दिसत होते.

नागपूर: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी पुकारलेल्या देशव्यापी जनता कर्फ्युच्या आवाहनला नागपुरातील नागरिकांनी १०० टक्के प्रतिसाद देत उपराजधानी लॉकडाऊन केल्याचे दृश्य रविवारी सकाळी अख्ख्या शहरात पहावयास मिळाले .रविवारच्या कर्फ्युच्या चर्चा आधीच रंगत होत्या. नागरिकांनी अत्यावश्यक खरेदी शनिवारी संध्याकाळीच उरकली होती. रविवारी सकाळी शहरातील मुख्य बाजारपेठांचा भाग असलेला सीताबर्डी, इतवारी, कॉटन मार्केट हे भाग पूर्णत: बंद होते. महाल हा नागपुरातला गजबजलेला भागही पूर्णपणे सुनसान होता. रस्त्यांवर पोलिसांच्या गाड्या फिरताना दिसत होत्या. तर चौकाचौकात वाहतूक पोलिसांसह खाकी वर्दीतले पोलिसही तैनात होते. रस्त्याने जाणाऱ्या एखाददुसºया व्यक्तीला थांबवून तो कुठे व कशासाठी जात आहे याची चौकशी केली जात होती.

नागपूरातील रस्ते असे ओसाड
भंडारा बसस्थानक ओसाड