Home Top News जहाल नक्षलवादी संतोष हिचामी यास अटक

जहाल नक्षलवादी संतोष हिचामी यास अटक

0

गडचिरोली, दि.४: जिल्हा पोलिस व केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी जहाल नक्षलवादी व पोटेगाव दलमचा सदस्य संतोष उर्फ शालिक हिचामी(२१) यास धानोरा तालुक्यातील हनपायली/सहापायली जंगलातून नुकतीच अटक केली.
जिल्हा पोलिस व केंद्रीय राखीव दलाचे जवान हनपायली/ सहापायली जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना त्यांना संतोष हिचामी हा संशयास्पद स्थितीत आढळून आला. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले असता, तो नक्षलवादी असल्याचे दिसून आले.संतोष उर्फ शालिक हिचामी हा धानोरा तालुक्यातील जप्पी येथील रहिवासी असून, तो २०१२ पासून पोटेगाव दलमचा सदस्य असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. २०१२ मध्ये आसावंडी व आबापूर, २०१३ मधील मुंगनेर व नंतरच्या गोटिया, गोडलवाही येथील चकमकी, मुरमुरी व कोटमी येथील भूसुरुंगस्फोट तसेच एडमपायली येथील जाळपोळीत संतोषचा सक्रीय सहभाग होता. त्याच्यावर २ लाख्‍ा रुपयांचे बक्षीस होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version