Home Top News जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर, जातींची माहिती टाळली

जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर, जातींची माहिती टाळली

0

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि ०३– स्‍वतंत्र भारतात पहिल्‍यांदाच केल्‍या गेलेल्‍या सामाजिक, आर्थिक आणि जाती आधारित जनगणना 2011 चा अहवाल केंद्र शासनाच्‍या ग्राम विकास मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केला. मात्र, यात जातीचे आकडेच दिलेले नाहीत. दरम्‍यान, हे आकडे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाकडून जाहीर केले जाणार असल्‍याचे शासनाच्‍या वतीने सांगण्‍यात आले. पण, कधी जाहीर केले जातील, याची काहीही माहि‍ती दिली नाही.
या बाबत ग्राम विकास मंत्रालयाचे वीरेंद्रसिंह चौधरी यांनी सांगितले, जनगणनेचे काम वेगवेगऴया मंत्रालयांच्‍या वतीने केले गेले. जातीनिहाय जनगणनेचे काम रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाकडून केले गेले. आम्‍ही आमच्‍याकडे असलेली आकडेवारी आणि तपशील जाहीर केला. मात्र, जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी कधी जाहीर केली जाईल, या बद़दल मी सांगू शकत नाही, असे ते म्‍हणाले.
अहवाल जाहीर करताना अर्थ मंत्री अरुण जेटली म्‍हणाले, सर्व सामान्‍य नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्‍यासाठी यातील आकडेवारी फायद़याची ठरणार आहे. 1932 नंतर 2011 मध्‍ये देशात क्षेत्र, समुदाय, जाती, उत्‍पन्‍न यावर जनगणाना झाली. केंद्र शासनाला यातील आकडेवारीचा फायदाच होणार आहे. पण, राज्‍य शासनासाठीही ती महत्‍त्‍वाची आहे. यातून भारतातील योग्‍य परिस्थिती समोर येणार आहे.
Census च्‍या 5 मोठ़या गोष्‍टी
1. किती कुटुंब भरतात इनकम टॅक्स?
– ग्रामीण भारतातील केवळ 4.6 टक्‍केच कुटुंब इनकम टॅक्स भरतात.
2. देशात किती कुटुंब त्‍यातील ग्रामीण भागात किती ?
– देशात एकूण 24.39 कोटी कुटुंब आहेत. यातील 17.91 कोटी कुटुंब खेड़यात राहतात. 2.37 कोटी कुटुंबांचे वास्‍तव्‍य केवळ एका खोलीच्‍या कच्‍च्‍या घरात आहे. 4.21 कोटी कुटुंबांत 25 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले सर्व सदस्‍य शाळेची पायरीसुध्‍द़ा चढलेले नाहीत.
3. किती कुटुंबांमध्‍ये महिला कुटुंब प्रमुख ?
– असे 65 लाख कुटुंब आहेत की, ज्‍यामध्‍ये एकही ज्‍येष्‍ठ सदस्‍य नाही. घरातील सर्वच सदस्‍य अल्‍पवयीन आहेत. या शिवाय 68.96 लाख कुटुंबांच्‍या प्रमुख महिला आहेत. त्‍यातील 16 लाख कुटुंब असे आहेत की ज्‍यामध्‍ये महिला कुटुंबाचे मासिक उत्‍पन्‍न 10 हजारांपेक्षा अधिक आहे. इतर कुटुंबातील महिलांची या यापेक्षा कमी कमाई आहे.
4. किती कुटुंब हाकतात शेतीवरच संसाराचा गाडा ?
– खेड़यांमध्‍ये राहणाऱया 17.91 कोटी कुटुंबांपैकी 5.39 कोटी कुटुंब केवळ शेतीतून आपल्‍या संसाराचा गाडा हाकतात. इतर घरांमध्‍ये घरकाम करून 44.84 लाख कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. कचरा वेचून 4 लाख कुटुंब जीवन जगत आहेत; तर 6.68 लाख कुटुंबातील सर्वच भिकारी आहेत.
5. नोकरीतून किती कुटुंबांचा उदनिर्वाह ?
– 2.50 कोटी कुटुंब म्‍हणजेच देशातील एकूण कुटुंबांपैकी केवळ 14% च कुटुंबाचे घर शासकीय किंवा खासगी नोकरीतून चालते.
ज्‍यांच्‍या घरात फ्रिज आहे, त्‍यांना शासनाने या Census मध्‍ये सहभागी केले नाही. या सर्वेक्षणासाठी शासनाने 14 निकष ठरवून दिले होते. त्‍यात न बसणाऱया कुटुंबांचा या Census मध्‍ये समावेश नाही. वाहन, शेतीची निगडीत यंत्रं, 50 हजार रुपयांपेक्षा अधिक ठेवी असलेले शेतकरी, तीन पेक्षा अधिक खोल्‍या असलेले पक्‍के घर, लँडलाइन फोन असणाऱयांनाही यातून बाहेर ठेवले.
काय होता या Census चा उद़देश?
– वेगगवेगऴया जातीतील व्‍यक्‍तींची सामाजिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेणे हा या जनगणनेचा उद़देश मुख्‍य उद़देश होता. 21 राज्यांतील 640 जिल्‍ह़यात त्‍याचे सर्वेक्षण झाले.
– दारिद्राचे मुख्‍य कारण काय आहे, याचे मूळ शोधण्‍याचे काम या जनगणनेच्‍या आधारे केले जाणार आहे. तसेच याच अहवालाच्‍या आधारे मनरेगा, नॅशनल हाउसिंग मिशन, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आणि इंदिरा आवास योजना राबवल्‍या जाणार आहेत.
देशात सध्‍या किती गरीब?
आरबीआईचे माजी गवर्नर सी. रंगराजन यांच्‍या समितीनुसार देशात सध्‍या 29.5% कुटुंब बीपीएल कॅटेगरीमध्‍ये आहेत. दरम्‍यान, सुरेश तेंडुलकर समितीनुसार, देशात दारिद्र रेषेखालील कुटुंबांची संख्‍या 21.9% एवढी आहे.

Exit mobile version