
गोंदिया, दि.१२ संपुर्ण जग कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडले असतांना जिल्ह्यातही त्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे.आज प्राप्त अहवालातून १७० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.एका बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर तब्बल ११८ रुग्ण औषधोपचारातून बरे होऊन घरी परतले आहे.जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४६ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ५ रुग्ण हे बाहेर जिल्हा किंवा राज्यातील आहे. गोंदिया येथे खाजगी रुग्णालयात भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील ६० वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्हयात कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची शक्यता आहे किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी विषाणू प्रयोगशाळेतून किंवा रॅपिड अँटिजेन चाचणीतून करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत प्रयोगशाळा चाचणीतून ५१५३ नमुने आणि रॅपिड अँटिजेन चाचणीतून १०८४ नमुने असे एकूण ६२२७ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.
आज जे १७० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ११३ रुग्ण आढळले आहे. यामध्ये अवंतीबाई चौक, गोटे कॉलनी,भिमनगर,दुर्गा चौक, गंज वार्ड, गायत्री कॉलनी, कुंभारेनगर, लक्ष्मी वार्ड, कटंगी, चुलोद, मनोहर चौक, मरारटोली, पंचायत समिती कॉलनी,पांढराबोडी, परसवाडा,साई कॉलनी, सूर्याटोला वार्ड, सुंदरनगर,सावरी,लाला चौक, नीलागोंदी, द्वारकानगर येथील प्रत्येकी एक रुग्ण, गंगाझरी,खापर्डे कॉलनी,रेल्वे कॉलनी, शास्त्री वार्ड, टिबीटोली, हिवरा येथील प्रत्येकी दोन रुग्ण, बाबू कॉलनी, गड्डाटोली, गौशाला वार्ड, कारंजा, टेमनी, रामनगर, रेलटोली,रापेवाडा येथील प्रत्येकी तीन रुग्ण, सिविल लाइन कनारटोली येथील प्रत्येकी चार रुग्ण, श्रीनगर व कुडवा येथील प्रत्येक पाच रुग्ण, फुलचूर व सिंधी कॉलनी येथील सात रुग्ण, गणेश नगर येथील नव रूग्ण,गोंदिया शहरातील अन्य भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे.
तिरोडा तालुक्यातील ११ रुग्ण असून यात तिरोडा शहरातील अन्य भागातील तीन रुग्ण,नेहरू वार्डातील तीन रुग्ण, तिलक वार्डातील चार रुग्ण व एक रुग्ण संत कंवरराम वॉर्डातील आहे. गोरेगाव तालुक्यातील ३ रुग्ण असून गोरेगाव शहरातील एक रुग्ण, गोंडखैरी व पाथरी येथील प्रत्येकी एक रुग्ण,आमगाव तालुक्यातील सोळा रुग्ण असून यात आमगाव शहरातील आठ रुग्ण, कट्टीपार येथील दोन रुग्ण, रामपूर येथील चार रुग्ण,पूर्णा कॉलनी व शिवनी येथील प्रत्येकी एक रुग्ण, सालेकसा तालुक्यातील सहा रुग्ण यात सालेकसा शहरातील दोन रुग्ण, सातगाव येथील तीन व पांढरी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. देवरी शहरात तेरा रुग्ण, सडक/अर्जुनी तालुक्यातील सहा रुग्ण असून कोहळीटोला व सिंधीपूर येथील प्रत्येकी एक रुग्ण,सौंदळ येथील चार रुग्ण. तर एक रुग्ण भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील आहे.
जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-१७६६ तिरोडा तालुका-४४२ गोरेगाव तालुका-११४, आमगाव तालुका- २२८, सालेकसा तालुका-९३, देवरी तालुका-१३९, सडक/अर्जुनी तालुका-९९, अर्जुनी/मोरगाव तालुका-१३७ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले-६० रुग्ण आहे. असे एकूण ३०७८ रुग्ण बाधित आढळले आहे.
आज ११८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका- ७७,तिरोडा तालुका -९,गोरेगाव तालुका-०२,आमगाव तालुका-१०, सालेकसा तालुका-७, देवरी-३, अर्जुनी/मोरगाव तालुका-९ व सडक/अर्जुनी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्हयात आतापर्यंत १६३५ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका-८८४, तिरोडा तालुका-३०५ गोरेगाव तालुका-४४, आमगाव तालुका-१२४, सालेकसा तालुका-५३, देवरी तालुका-५६, सडक/अर्जुनी तालुका-६८, अर्जुनी/मोरगाव तालुका-९४ आणि इतर-७ रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या आता १३९७ झाली आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका-८५८, तिरोडा तालुका-१२७, गोरेगाव तालुका-७०, आमगाव तालुका-९९, सालेकसा तालुका-३९, देवरी तालुका-८४, सडक/अर्जुनी तालुका-२९, अर्जुनी/मोरगाव तालुका-४३ आणि इतर-४८ असे एकूण १३९७ रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत. त्यापैकी १३८४ क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात व १३ रुग्ण नागपूर येथे उपचार घेत आहेत.
कोरोना क्रियाशील रुग्णांपैकी ४०१ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-३६८, तिरोडा तालुका-१०, गोरेगाव तालुका-००, आमगाव तालुका-६, सालेकसा तालुका-३, देवरी तालुका-१, सडक/अर्जुनी तालुका-३, अर्जुनी/मोरगाव तालुका-१० व इतर ०० असे एकूण ४०१ क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.
जिल्हयात आतापर्यंत ४६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-२२, तिरोडा तालुका-१०, गोरेगाव तालुका-१, आमगांव तालुका-५, सालेकसा तालुका-१, सडक/अर्जुनी तालुका-२ व इतर ठिकाणच्या पाच रुग्णांचा समावेश आहे.
विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण २२१२४ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये १८५३७ नमुने निगेटिव्ह आले. तर ५१५३ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. ६८८ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून ७४६ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात १६ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ४९३ व्यक्ती अशा एकूण ५०९ व्यक्ती विलगिकरणात आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत १६७१२ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये १५६२८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. १०८४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी १९६ चमू आणि १४८ सुपरवायझर १५१ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-९, आमगाव तालुका-२८, सालेकसा तालुका-१४, देवरी तालुका-२५, सडक/अर्जुनी-१९ गोरेगाव तालुका-२२, तिरोडा तालुका-३१ आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-३ असे एकूण १५१ कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात कार्यरत आहे.