बाल संगोपण योजनेची राशी दोन वर्षापासून प्रलंबित

- लाभार्थ्यांची मागणी : पालक वर्ग चिंतेत, पायपिट सुरुच

0
283

अर्जुनी-मोर,दि.13ः ग्रामीण भागासह शहराच्या अनेक ठिकाणी छत्र हरवलेले बालक अडचणींना समोर जाऊन पालकांच्या आधारावर जगत आहेत. परंतु, बाल संगोपण जिल्हा कार्यालय यांच्याकडून दोन वर्षापासून अजिबात पैसे जमा झालेच नाही. म्हणून तात्काळ सदर योजनेची राशी जमा करावी अशी मागणी लाभार्थ्यांचे पालक करत आहे.

जवळील चिचोली येथील मनिष हरदीप गोंडाणे या मुलाची आई मरण पावल्यावर, सदर योजनेचा लाभ मिळावा म्हणून लाभार्थ्याच्या पालकाने 2018 या साली आवेदन पत्र भरले, कागदपत्रांची जिल्हा कार्यालय दाखलही झाली, पण अजूनही कोणताच हफ्ता बालकाच्या खात्यात जमा झाला नाही. योजनेची राशी जमा होण्यासाठी अनेकवेळा कार्यालयाच्या चकरा मारण्यात आल्या, पण काही फायदा नाही.
सदर प्रकरणाबाबत अनेकवेळा जिल्हा कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्यातही आले, कार्यालयात गेल्यावर या हफ्त्यात जमा करु, तुम्ही तुमचे खाते नंबर तपासा हेच बोलतात, आणि परत पाठवितात. जातीने लक्ष घालत नाही. म्हणून बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अधिकारी व कर्मचारी यांना यांना वेतन मिळते म्हणून त्यांच्या संसाराचा गाडा चालतो पण गरिब-सामान्य नागरिकांनी कसे जगावे.
योजनेचे पैसे जमा केव्हा होणार?, का बर जमा करण्यात आले नाही, किंवा थोडीफार विचारपुस करण्यासाठी जिल्हा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा भ्रमणध्वनी लागत नाही, नेहमी संपर्काच्या बाहेरच असतात. आणि लागला तर फोन स्वीकारत नाही. अशावेळी लाभार्थ्यांच्या पालकांनी काय करावे. खुप गंभीर बाब आहे.
कोरोनाच्या भयान संकटात हाताला काम नाही, रोजगाराचा साधन नाही, कोणत्याही प्रकारची मजूरी नाही, तर बालकांना जगवायचे कसे, योजनाही मिळाली नाही असा चिंताजनक प्रश्न पालकांसमोर उभा झाला आहे.