अर्जुनी मोर. शहरात तिन दिवसाचा जनता कफ्युचा निर्णय

0
61

अर्जुनी मोर:- शहरात वाढत्या कोरोना संक्रमनाचा आकडा लक्षात घेता स्थानिक व्यापारी व नागरिकांनी अर्जुनी मोर. शहरात दिनांक 25 ते 27 सप्टेंबर पर्यंत तिन दिवस कडक जनता कफ्यु पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात पंचायत समिती सभागृहात व्यापारी पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांची सभा ( दि. 22 ) नगराध्यक्ष किशोर शहारे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला तहसीलदार विनोद मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भुते प्रामुख्याने उपस्थित होते. तिन दिवसांच्या जनता कफ्यु दरम्यान बिनाकामाने बाहेर फिरने,मास्क न लावणे यावर पोलीस व नगरपंचायत प्रशासन द्वारा कडक कारवाई करुन दंडाची कार्यवाही करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. जनता कफ्यु लागण्यापूर्वी नगरपंचायत प्रशासनाने दोन दिवसापूर्वी सार्वजनिक दवंडीद्वारे सुचना देवुन नागरिकांनी जीवनावश्यक वस्तु व अन्य सामुग्री घेण्याचे नागरीकांना आवाहन करण्याचे सभेत ठरविण्यात आले आहे. जनता कफ्यु चे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करण्यात यावी असेही सुचविण्यात आले.तिन दिवसाच्या जनता कफ्यु नंतर म्हणजे सोमवार पासुन बेमुदत व्यापारी प्रतिष्ठान सकाळी 9 वाजेपासुन 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.