साकोली-उपदेश बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत चैतन्य कला कनिष्ठ महाविद्यालय बाम्पेवाडा साकोली येथील अनुदानित शाळेतील बनावट कर्मचारी दाखवून विविध बँकेतून कर्जाची उचल प्रकरण उघड झाल्याची सूड उगवून संस्था सचिव कैलास गोमा मळामे व कुटुंबीयांनी सरळ शाळा बंद करण्याची धमकी देत कर्मचा-यांना बाहेर करीत शाळेला कुलूप ठोकले.
उपदेश बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत चैतन्य कला कनिष्ठ महाविद्यालय बाम्पेवाडा साकोली येथील अनुदानित शाळा आहे.सदर शाळेत बनावट कर्मचारी व कर्जाची उचल प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आले. याचा राग व सूड भावनेतून शनिवार दिनांक १९सप्टेंबर ला शाळेत सचिव कैलाश गोमा मळामे,रिना कैलाश मळामे,देवानंद गोमा मळामे यांनी कर्मचा-यांनी आमच्या विरुद्ध केलेली तक्रार परत घ्यावी , तुमची नौकरी मी खाणार, सेवा पुस्तिका खराब करून फडणार तर,कर्मचाऱ्यांना खोटे प्रकरणात अडकवणार असा सूड काडून सरळ शालेलाच टाळे ठोकले.त्यामुळे शाळेतील कामकाज शनिवार पासून बंद पडले आहे.
सदर बाबत प्राचार्य व कर्मचारी यांनी शिक्षकणाधिकारी व पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केले आहे.सदर शाळेतील विविध गैरप्रकार आता चव्हाट्यावर आले आहे. नौकारीवर असलेल्या कर्मचार्याविरुद्ध कट रचणे,खोटे आरोप लावणे, बनावट कागदपत्रे सादर करणे याविषयी कर्मचारी यांचे आर्थिक व मानसिक छळ करण्यात येत असल्याची तक्रारी प्रशासन कडे प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे ज्या कर्मचा-यांनी नौकरी सोडून गेल्यावरही त्या कर्मचराला सेवेत कार्यरत दाखवून त्याचेही दोन महिन्यांच्या वेतनाची उचल करून फ्रॉड केल्याची तक्रार पुढे आली आहे.संस्थेच्या सचिव कुटूंबीय शाळेत मालकी दाखवून कर्मचारी यांना प्रतादिड करीत असल्याने आता कर्मचारी यांनी पोलीस व प्रशासनाकडे सुरक्षिततेची मागणी व कार्यवाहीची मागणी केली आहे .
सूड भावनेतून सचिवसह कुटुंबाने लावले शाळेला कुलूप
#चैतन्य कला कनिष्ठ महाविद्यालय बाम्पेवडा प्रकरण