गडचिरोली जिल्हयात 93 कोरोना बाधितांची नोंद,56 जण कोरानामुक्त

0
55

गडचिरोली दि.22 सप्टेंबर : जिल्हयात आज कोंढाळा वडसा येथील 57 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तो चामोर्शी तालुक्यात एमपीडब्लु म्हणून कार्यरत होता. तसेच आज नवीन 93 कोरोनाबाधितांचीही नोंद झाली तर 56 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 490 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 2086 रूग्णांपैकी 1582 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवीन 93 बाधितांमध्ये गडचिरोली 33 यामध्ये आयटीआय चौक 4, नवेगाव कॉम्लेतपक्स 2, जिल्हा परिषद कर्मचारी 7, सोनापूर कॉप्लेक्स 1, विवेकानंदनगर 3, चामोर्शी रस्ता 1, पोर्ला 1, कन्नमवार वार्ड 1, सर्वोदया वार्ड 2, पोलीस स्टेशन 1, इंदिरा नगर 1, गणेश कॉलनी 1, आयोध्यानगर 1, एसआरपीएफ 4, हनुमान वार्ड 1 व चंद्रपूर जिल्हयातील 2 जणांचा समावेश आहे. अहेरी 14 जण यात अहेरी शहर 5, आलापल्ली 2, महागाव 5, बोरी 1, चेरपल्ली 1 जणाचा समावेश आहे. वडसा येथील 6 जणांमध्ये आमगाव 1 व वडसा शहरातील 5 जणांचा समावेश आहे. धानोरा 2 मध्ये शहरातील 1 व मिछगाव मधील 1, आरमोरी 11 यामध्ये शहरातील 5, डोंगरगाव 3, अंबेशिनो 1, अर्सोदा 1, शिर्सि 1 यांचा समावेश आहे. सिरोंचा 3, कोरची 6, कुरखेडा 10, चामोर्शी 1, एटापल्ली 3, भामरागड 2 व मुलचेरा येथील 2 जणांचा समावेश आहे.

एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 56 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोलीमधील 27 जणांचा समावेश आहे. सिरोंचा 5, अहेरी 7, चामोर्शी 4, आरमोरी 1, धानोरा 3, मुलचेरा 1, एटापल्ली 2 व वडसा 6 जणांचा समावेश आहे.