गोंदिया,,दि.24ः-जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या ४० प्राथमिक आरोग्य केंद्र व २३९ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाèयांना कोरोना संसर्ग काळातही वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी कोषागार कार्यालयातील कर्मचाèयांनी केल्याचे बोलले जात आहे.कोरोना काळात सर्वाधिक काम गावखेड्यापासून शहरातील रुग्णालयापंर्यंत कुणी करीत असेल तर आरोग्य विभागाचा कर्मचारी अधिकारी.रात्रqदवस काम करणाèया या विभागातील कर्मचारी व अधिकारी यांचे वेतन मात्र कोषागार कार्यालयातील कर्मचारी वेळेवर न काढता शाईची प्रत आणा हे आणा असे काही कारणे दाखवून महिनोमहिने उशीर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मे महिन्यात सादर केलेले वेतन प्रकरणाची फाईल कोषागार कार्यालयाकडून ऑगस्टमहिन्यात निकाली काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.मे महिन्यापासून ऑगस्टपर्यंत या आरोग्य विभागातील कर्मचाèयांना वेतनाअभावी आपले जिवन जगावे लागले आहे.त्यानंतरचेही त्यांच्या वेतनाचे देयके अद्यापही निघालेले नसल्याचे वृत्त असून जिल्ह्यात २४ तारखेला येणाèया आरोग्यमंत्र्यासह पालकमंत्र्यांनी गोंदियाच्या कोषागार कार्यालयातील अधिकारीसह कर्मचाèयांची कार्यशाळा घ्यावे असा सुर संतप्त आरोग्य विभागातील कर्मचारी करु लागले आहेत.त्यातच आरोग्य विभागात देयकांसह इतर कामासाठीच लेखावर्गातील कर्मचारी अपुरे असल्याचे बोलले जात आहे.अद्यापही लेखा वर्गात पदोन्नती करण्यात आलेल्या नाहीत त्यासोबतच विभाग बदल्यांना सुध्दा लेखा अधिकाèयांनी खो दिल्याने त्याचाही फटका बसू लागला आहे.