विस्तार अधिका-यावर खुनाचा गुन्हा करा दाखल

समता सैनिक दल वर्धाच्यावतीने गृहमंत्र्यांकडे मागणी

0
295

वर्धा-हिंगणघाट पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी दिलेल्या मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळून बडतर्फ ग्रामसेवकाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विस्तार अधिकारी एस. के. हेडाऊ यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा. मागासवर्गीय कर्मचा-याचा छळ केल्याप्रकरणी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समता सैनिक दल वर्धाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ग्रुहमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत येणा-या शेगाव कुंड ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत बुद्धघोष म्हस्के यांनी बुधवार,16 सप्टेंबर रोजी घरी गळफास लावून आत्महत्या केली. मृतक बुद्धघोष म्हस्के यांनी मृत्युपूर्वी आत्महत्येस प्रवृत्त करणा-या व्यक्तीबाबत स्व:लिखित चिठ्ठी लिहून ठेवली होती. चिठ्ठीमध्ये त्यांनी विस्तार अधिकारी एस. के. हेडाऊ मानसिक व आर्थिक त्रास देत असल्यामुळे आत्महत्या करीत आहे, असे नमूद केले आहे.