भंडारा दि.24 : जिल्ह्यात आज 95 रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2751 झाली असून 202 पॉझिटिव्ह रुग्णांची आज नव्याने नोंद झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4413 झाली आहे.कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 137, साकोली 06, लाखांदूर 07, तुमसर 15, मोहाडी 15, पवनी 17 व लाखनी तालुक्यातील 05 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 2751 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 4413 झाली असून 1568 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 04 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 94 झाली आहे.आज 24 सप्टेंबर रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 178 व्यक्ती भरती असून 1928 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्यात आणखी ९९ कोरोना बाधित; ९५ जणांना डिस्चार्ज
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिंधी कॉलनी येथील १, सुभाष चौक येथील १, पाटणी चौक येथील १, रावले नगर येथील १, लाखाळा परिसरातील ४, काळे फाईल येथील २, योजना पार्क परिसरातील २, सुदर्शन नगर येथील १, आययुडीपी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, शेलू खुर्द येथील १, शिरपुटी येथील १, गोंडेगाव येथील १, टो येथील ६, शेलगाव येथील २, मानोरा शहरातील १, हातोली येथील ३, रिसोड शहरातील गजानन नगर येथील १, अनंत कॉलनी परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे ३, लोणी फाटा येथील २, बेलखेडा येथील २, पिंप्री सरहद येथील १०, देगाव येथील २, नेतान्सा येथील २, लोणी येथील १, हराळ येथील १, येवती येथील १, मंगरूळपीर शहरातील १, शेलूबाजार येथील २, माळशेलू येथील ६, धोत्रा येथील २, कासोळा येथील १, मालेगाव शहरातील ६, शिरपूर जैन येथील १, डव्हा येथील २, इराळा येथील १, कारंजा लाड शहरातील आशाताई गावंडे कॉलनी परिसरातील १, सिंधी कॅम्प येथील ३, टिळक चौक येथील ४, आनंद नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पारवा कोहर येथील १, कामरगाव येथील ३, मेहा येथील २, धनज येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ९५ व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच मालेगाव येथील ५८ वर्षीय पुरुष, वाशिम येथील ४० व ७० वर्षीय पुरुष आणि कारंजा लाड येथील ६५ वर्षीय पुरुषाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ३८८३
ऍक्टिव्ह – ८४८
डिस्चार्ज – २९५७
मृत्यू – ७७
इतर कारणाने मृत्यू – १