अर्जुनी मोर:- नवेगाव बांध हे पर्यटन क्षेत्राच्या विकास करण्यासाठी विविध योजनांचा माध्यमातून आपण सर्व मिळून नवेगाव पर्यटन चा विकास करणार. सर्वांचे निस्तार हक्क हे अबाधीत ठेवून सर्व काम होईल. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाला नैसर्गिक साधनसंपत्ती मिळुन मागील काही वर्षांपासून विकास झालेला नाही. पक्षी अभयारण्य उभारणी करतांना निस्तार हक्क जानार नाही. मासेमारी धोक्यात येणार नाही तरच पुढील कार्यवाही करावी असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
नवेगाव बांध येथे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षी अभयारण्य उभारणी संदर्भात सभा घेण्यात आली. सभेला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक रामानुजन , उपवनसंरक्षक कुलराजसिंह , उप संचालक पुनम पाटे, सह्यायक उपवनसंरक्षक प्रदीप पाटील, सह्यायक उपवनसंरक्षक आर्या राऊत, किशोर तरोणे, अनिरुद्ध शहारे, संजीव बडोले, विजय डोये , रचना गहाणे, सतिष कोसरकर, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.