26 सप्टेंबरला न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन

0
325

गोंदिया,दि.25-गोंदिया येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भुषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर हे असतील. तर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्यायमूर्ती नितीन बोरकर उपस्थित राहणार आहेत. तरी या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टेकचंद कटरे यांनी केले आहे.