डॉ.प्रा.दिशा मानिकराव गेडाम यांचे सुयश

0
444
गोंदिया,दि.25ः-महाराष्ट्र योग शिक्षक संघ नागपूर द्वारा आयोजित covid-19 व योग या  विषयावर आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत गोंदिया जिल्ह्यातून डॉ.प्रा. दिशा माणिकराव गेडाम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला असून त्यांनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय वडील कवी,लेखक,समीक्षक व सेवानिवृत्त प्राचार्य माणिकराव गेडाम यांना दिले आहे.प्रा.डॉ. दिशा माणिकराव गेडाम गोंदिया येथील एस.एस. गर्ल्स महाविद्यालयात प्राध्यापक पदावर कार्यरत असून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे विशेष योगदान आहे. या आधीही त्यांनी अनेक पारितोषिके व पुरस्कार पटकावले आहेत. प्राप्त केलेल्या यशाबद्दल विद्यालयातील प्राचार्यासह सर्व प्राध्यापक वृंदानी अभिनंदन व्यक्त करीत पुढील भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या