प्रा. विनोदकुमार मुलचंद माने यांचे सुयश 

0
197
गोंदिया,दि.25:- सिल्वर ग्रुप पुणे, महाराष्ट्र द्वारा आयोजित ‘आत्मनिर्भर भारत निर्माण हेतु युवाओं की भूमिका’ या राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धेत जी.ई.एस.हायस्कूल व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पांढराबोडी ता+जि. गोंदिया येथे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत प्रा.विनोदकुमार मुलचंद माने यांनी राष्ट्रीय स्तरावरील आयोजित या निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय खासदार प्रफुल्ल पटेल, वर्षाताई पटेल, संस्थेचे सचिव राजेंद्र जैन, संचालक निखील जैन, विद्यालयाचे प्राचार्य बी.एच.जीवानी, पर्यवेक्षक एच.ए.नागपुरे, वरिष्ठ शिक्षक यु.सी.रंहागडाले, क्रीडा प्रशिक्षक पी.एच.चव्हाण, पत्नी सौ सुषमा विनोदकुमार माने, आई फुलवंता माने, वडील मुलचंद माने, सेवानिवृत्त प्राचार्य मानिकराव गेडाम, फागोराव घरडे, निलाताई घरडे, डॉ प्रा.दिशा गेडाम,  धनंजय घरडे, मनोज घरडे, मुलगा आयुष माने, खिलेश माने, मुलगी कु खुशाली माने, भाऊ प्रविण माने आणि विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना आपल्या यशाचे श्रेय दिले आहे. विद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत विनोदकुमार माने यांचे  शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून,शालेय विद्यार्थ्यांसाठी ते विविध अभिनव उपक्रम राबवित असतात. याआधीही त्यांनी अनेक राष्ट्रीय व राज्य स्तरावरील तसेच जिल्हास्तरावरील अनेक पारितोषिके पटकावली आहेत.