नागपूर,दि.25ःनुकतेच सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असुन अनेक नेते व अनेक संघटना मराठा समाजाचा समावेश ओबीसी संवर्गात करुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.असे म्हणत आहे.मात्र हे चुकीचे आहे.अजुनपर्यत ओबीसीचे १९% आरक्षण महाराष्ट्रातील अनेक जिल्हात मिळालेले नाहीत.त्यात चंद्रपुर ११% यवतमाळ १४%, धुळे, नंदुरबार, नाशिक, रायगड, पालघर ९% आणि गडचिरोली ६% अशा प्रकारे ओबीसीच्या आरक्षणात विसंगती दिसुन येते. ही विसंगती त्वरित दुर करण्यात यावी तसेच मराठा आरक्षणाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध नाही मात्र मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करु नये या मागणीचे निवेदन नागपूर जिल्हाधिकारी मार्फेत पाठविण्यात आले आहे.निवेदन देतेवेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे,प्रा.शरद वानखेडे, शकील पटेल, सुषमा भड, Adv रेखा बारहाते, उदय देशमुख, सुधाकर तायवाडे, सुरेश वर्षे , चंद्रकांत हिंगे, सुनिता येरणे आदि उपस्थित होते.