गोंदिया,दि.25:जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोना बाधित रुग्णांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अमलबजावणी न केल्यास तसेच अँटीजन व rt-pcr तपासणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींनी आरोग्य विभाग किंवा प्रशासनाला कोणतीही सूचना न देता विनापरवानगी स्वगृही अलगीकरण ( Home Quarantine) केल्याचे निदर्शनास येताच अशा व्यक्तीवर 10 हजार रुपयाच्या दंडासह फौजदारी कार्यवाही करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी काढले आहे.
त्यामुळे अनेक नागरिकांना कोरोना आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशा परिस्थितीत अनेक नागरिक खाजगी शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करतात व पॉझिटिव्ह परिणाम आल्यावर आरोग्य विभाग व तसेच प्रशासनाला कोणतीही माहिती न देता घरीच राहतात. त्यामुळे कोरोना आजार प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून असे कृत्य करणाऱ्या नागरिकांवर तसेच गृह विलगीकरण अलगीकरण नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीची कार्यवाही करणे अपेक्षित आहे. संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच साथी रोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता 1860 व कलम 188 अन्वय गुन्हा दाखल करून दंडाची रक्कमही वसूल करण्याचे आदेश जारी केले आहेत.