नव्याने दाखल 11 रुग्णवाहिकांचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे हस्ते वितरण

0
155

गडचिरोली,दि.25: जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्ह्यात विशेष केंद्रीय सहायता निधीमधून घेण्यात आलेल्या 11 रुग्णवाहिकांचे वितरण जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे हस्ते तालुक्यांना करण्यात आले. यावेळी रुग्णवाहिकेच्या चाव्यांचे हस्तांतरण उपस्थित चालकांकडे करण्यात आले.
जिल्हयातील 3 उपजिल्हा रुग्णालय यात कुरखेडा, अहेरी, आरमोरी व 8 ग्रामीण रुग्णालये यामध्ये चामोर्शी वगळता इतर सर्व तालुक्यांना नवीन रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या. चामोर्शी येथे या अगोदरच रुग्णवाहिका उपलब्ध आहे. या नवीन 11 रुग्णवाहिकांमुळे कोरोना संसर्ग काळात महत्वाची मदत मिळणार असल्याचे दीपक सिंगला यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, डॉ. मुकुंद ढबाले, महेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दैनंदिन स्वरुपात वाढत आहे. या नव्याने दाखल झालेल्या रुग्णवाहिकांमुळे रुग्णांची ने-आण करण्यासाठी उपयुक्त मदत होईल. तसेच दुर्गम भागातील रुग्ण सेवेसाठीही या रुग्णवाहिकांची सेवा घेतली जाणार आहे.