गडचिरोली,दि.25: जिल्हयात आज नवीन 85 कोरोना बाधितांची नोंद झाली तर 62 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 626 झाली असून आत्तापर्यंत एकुण बाधित 2375 रूग्णांपैकी 1734 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 15 जणांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नवीन 85 बाधितांमध्ये गडचिरोली 34 यामध्ये आयटीआय चौकाजवळील 2, नवेगाव कॉम्प्लेक्स मधील 1, जिल्हा परिषद 2, सोनापूर कॉम्प्लेक्स 1, विवेकानंदनगर 1, चामोर्शी रस्ता 1, येवली 1, सर्वोदया वार्ड 2, पोलीस कॉम्प्लेक्स 2, गणेश कॉलनी 1, अयोध्या नगर 1, आरमोरी रस्ता गड. 1, कारगिल चौकाजवळ 1, अलंकार टॉकीज मागे 1, रेड्डी गोडाऊन 1, रामनगर 3, शिवाजी वार्ड 1, भगतसिंग वार्ड 1, लांजेडा 2, कॅम्प एरिया 1, गोकुळनगर 1, मुरखळा 1, वसंत शाळेजवळ 1 यांचा समावेश आहे.
अहेरी येथे 5 जण बाधित आढळले यात शहरात 4 व आलापल्लीला 1 जण बाधित आढळला. वडसा तालुक्यात 14 नवीन बाधित यात विसोरा 1, वडसा शहर 11, कुरूड 2 यांचा समावेश आहे. धानोरामधील येरकड येथील 2 बाधित आढळून आले. आरमोरी शहरातील 2 जण बाधित आढळून आले. कोरची मधील 5 जण यात बोटेकासा 2 तर शहरातील 3 जण बाधित मिळाले. कुरखेडा कढोली येथील 6 जण कोरोना बाधित आढळले. चामोर्शी 9 यात योणापूर 1, आष्टी 3, अंखोडा 1, मरोडा 1 चामोशी 2 तर वाघदरा 1 जण बाधित मिळाला. एटापल्ली शहरातील 2 जण बाधित मिळाले. भामरागडमधील 5 जण बाधित मिळाले. तसेच मुलचेरा गोविंदपूर येथील 1 जण कोरोना बाधित आढळून आला आहे. असे वेगवेगळया तालुक्यात आज 85 जण कोरोना बाधित आढळले.
तसेच एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 62 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली 33, आरमोरी 2, धानोरा 1, वडसा 17, मुलचेरा 1, एटापल्ली 1 व चामोर्शी 7 जणांचा समावेश आहे.