ग्रामीण रुग्णालयात कोरोनाचा शिरकाव,तीन कर्मचारी बाधित

0
304

अर्जुनी मोरगाव,दि.26ः कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे.या महामारीने सामान्यांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही सोडले नाही. स्थानिक ग्रामिण रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्या दोघानाही अर्जुनी येथील कोवीड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे.रुग्णालयातील तीन कर्मचारी बाधित असल्याचा अहवाल 21 सप्टेंबरला प्राप्त झाला.यापैकी दोघे ग्रामीण रुग्णालयात सेवा देत होते.तर एक अर्जुनी येथील कोविड केअर सेंटरमध्ये  कार्यरत सफाई कर्मचारी आहे.या तिघांचाही कोरोना चाचणी अहवाल 21 सप्टेंबरला रात्री उशिरा प्राप्त होऊन त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.त्यांना 22 सप्टेंबरला कोविड केअर सेंटरमध्ये भर्ती करण्यात आले.
सुरक्षितता म्हणून रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आहे.