Home विदर्भ खुल्या सैन्य भरतीसंदर्भात आवाघमारेंची चर्चा

खुल्या सैन्य भरतीसंदर्भात आवाघमारेंची चर्चा

0

भंडारा, दि ८ -जिल्ह्यात खुली सैन्य भरती घेण्यात यावी, अशी मागणी करीत तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी नागपूर येथे कर्नल एम.के.जोशी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावर सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भंडारा जिल्ह्यातील युवकांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळावी म्हणून जिल्ह्यात खुली सैन्य भरती घेण्यात यावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी आ. चरण वाघमारे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर भंडारा येथे आले असता त्यांना निवेदन देऊन केली होती. या मागणीची दखल घेत संरक्षण मंत्र्यांनी संबंधितांना निर्देश दिले. त्यानुसार कारवाई सुरू झाली असून, या संदर्भात आ. चरण वाघमारे यांनी नागपूर येथे कर्नल जोशी यांच्याशी भेटून चर्चा केल्याचे समजते. विभागाच्या वतीने भंडारा जिल्हाधिकार्‍यांना खुल्या सैन्य भरतीसंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने पत्र पाठविल्याचीही माहिती आहे. जिल्ह्यात सैन्य भरती झाल्यास बुलढाणा वगळता सर्व १० जिल्ह्यातील तरुणांना भरतीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

Exit mobile version