गोंदिया 124 बाधित रूग्ण : 56 रूग्णांना डिस्चार्ज

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.2 टक्के ,,,, साडेसात हजार रूग्णांची कोरोनावर मात

0
753

गोंदिया,दि.16 -गेले काही दिवस कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात कमी झाला होता.आता पुन्हा संसर्ग वाढायला लागला आहे.हे आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांच्या संख्येवरून दिसून येत आहे.गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेच्या आज 16 ऑक्टोबर रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी नवे 124 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 56 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.जिल्ह्यात रुग्ण उपचारातून बरे होण्याचे प्रमाण 88.2 टक्के आहे. आतापर्यंत 7511 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आहे.

आज आणखी 124 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ती रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढील प्रमाणे. गोंदिया तालुका-55, तिरोडा तालुका -02 , गोरेगाव तालुका-05, आमगाव तालुका -20, सालेकसा तालुका-03, देवरी तालुका 15, सडक/अर्जुनी तालुका -11 आणि अर्जुनी/मोरगाव- 13 अशी आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित रुग्ण तालुका निहाय पुढीलप्रमाणे आढळून आले आहे. गोंदिया तालुका -4883, तिरोडा तालुका -1056, गोरेगाव तालका -357,आमगाव तालुका -556,सालेकसा तालुका -368, देवरी तालुका-359, सडक/अर्जुनी तालुका-354,अर्जुनी/मोरगाव तालुका-374 आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले- 90 रुग्ण आहे.असे एकूण 8397 रुग्ण बाधित आढळले आले.

आज 16 ऑक्टोबर रोजी 56 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ती संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका-41, तिरोडा तालुका-02, गोरेगाव तालुका-02, आमगाव तालुका -03, सालेकसा तालुका-02, देवरी तालुका-02, सडक/अर्जुनी तालुका – 04 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-00 असा आहे.

7511 रुग्णांनी कोरोनावर आतापर्यंत मात केली आहे.ती रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -4381, तिरोडा तालुका- 991, गोरेगाव तालुका-322,आमगाव तालुका-496,सालेकसा तालुका- 353, देवरी तालुका-302,सडक/अर्जुनी तालुका-290, अर्जुनी/मोरगाव तालुका-296 आणि इतर-80 रुग्णांचा समावेश आहे.

क्रियाशील रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका -437,तिरोडा तालुका-49, गोरेगाव तालुका- 31,आमगाव तालुका-54, सालेकसा तालुका -13, देवरी तालुका-55, सडक/अर्जुनी तालुका- 61,अर्जुनी/मोरगाव तालुका-76 असे एकूण 776 रुग्ण कोरोना क्रियाशील असून विविध शासकीय व खाजगी दवाखान्यात तसेच अलगिकरणात राहून उपचार घेत आहे.

क्रीयाशील असलेले 301 रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-155, तिरोडा तालुका-25, गोरेगाव तालुका -17,आमगाव तालुका -22 , सालेकसा तालुका-07,देवरी तालुका -22,सडक/अर्जुनी तालुका-22,अर्जुनी/मोरगाव तालुका-31रुग्ण आहेत.

रुग्ण कोरोना आजारातून बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात 88.02 टक्के आहे.तर बाधीत रुग्णांचा मृत्यु दर हा 1.28 टक्के असा आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात 110 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-65, तिरोडा तालुका-16, गोरेगाव तालुका-4, आमगाव तालुका-6, सालेकसा तालुका-2 देवरी तालुका-2, सडक/अर्जुनी तालुका-3, अर्जुनी/मोरगाव तालुका -2 व बाहेर जिल्हा व राज्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण 34675 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 26516 नमुने निगेटिव्ह आले. तर 5293 नमुने पॉझिटिव्ह आले आहे. 262 नमुन्यांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

गृह विलगिकरणात 152 व्यक्ती आणि संस्थात्मक विलगीकरणात 2 व्यक्ती आहे.कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत 30268 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 27259 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. 3009 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 26 चमू आणि 23 सुपरवायझर 23 कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-04,आमगाव तालुका-00 सालेकसा तालुका-00, देवरी तालुका -03, सडक/अर्जुनी तालुका-01, गोरेगाव तालुका-04, तिरोडा तालुका -11 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका -00 असे एकूण 23 कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात कार्यरत आहे.