संविधान विरोधी राज्यपाल कोश्यारी ची उचलबांगडी करा -:भाकप सचिव हिवराज उके 

 निदर्शने आंदोलनाद्वारे राष्ट्रपतीच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर 

0
65
भंडारा दि. १६ : :– संविधान  विरोधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राष्ट्रपतीने उचलबांगडी करावी या मागणीसाठी व निषेध करण्यासाठी भाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांच्या नेतृत्वात दिनांक 16 /10/ 2020 ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करून  मान. जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती व मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.
 निवेदनात राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. घटनादत्त मूल्यांचे संरक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य असते तथापि ते या कर्तव्यापासून ढळले आहेत.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या औपचारिक पत्रात ते म्हणतांत-हिंदुत्ववादी असूनही गेल्या काही महिन्यापासून राज्यातील राज्यातील देवदेवतांना टाळेबंदीत ठेवण्यात आले आहेत. प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की , तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष बनला आहात?
 त्यांचे हे विधान उघडपणे घटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या मूल्याला सुरुंग लावते .मुख्यमंत्री वैयक्तिक पातळीवर विशिष्ट धार्मिक विचारसरणीचे असू शकतात .मात्र मुख्यमंत्री हे पद धर्मनिरपेक्ष असते. तरीही मुख्यमंत्र्यांना हिंदुत्ववादी असूनही असे स्वतः एका धर्मनिरपेक्ष पदावर असताना संबोधने ,दैवी संकेत  मिळत आहेत अशी सवंग शेरेबाजी करणे ही  घटनेची घोर पायमल्ली आहे. ज्या घटनादत्त कर्तव्यासाठी या राज्यपालाची आपण नियुक्ती केली आहे त्यांचेच हे हनन करत आहेत.
 म्हणूनच ह्या संविधान विरोधी  राज्यपालांची तातडीने उचलबांगडी करून त्यांना घरी पाठवावे अशी आम्ही आपणास मागणी करण्यात येत आहे.निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी माननीय शिवराज पडोळे यांनी स्वीकारले .शिष्टमंडळात व निदर्शने आंदोलनात सर्वश्री कॉम्रेड हिवराज उके जिल्हा सचिव भाकप. कॉम्रेड सदानंद राज्य कौन्सिलर, कॉम्रेड गजानन पाचे तालुका सचिव ,कॉम्रेड वामनराव चांदेवार, कॉम्रेड मानिका सत्तदेवे,ललिता गजभिये,काॅम्रेड मंगला सत्तदेवे काॅ. गौतम भोयर, काॅ.महानंदा गजभिये, काॅ. गणेश चिचामे,काॅ. महादेव आंबाघरे,काॅ. मिताराम उके पिर्तेश धारगावे इत्यादींचा  सहभाग होता.   …काॅ. हिवराज उके , जिल्हा सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा भंडारा