झाडीपट्टी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्य कलावंत नारायण मेश्राम यांचे निधन

0
549

अर्जुनी-मोर,दि.१७:: झाडीपट्टी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्य कलावंत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रदीर्घ सेवा देणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नारायण इस्तारी मेश्राम वय 84 वर्ष यांचे दिनांक 17 ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता वृद्धापकाळ व आजाराने दुःखद निधन झाले. गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यात होणाऱ्या हौसी व व्यावसायिक नाटकांमधून त्यांनी उभा केलेला खलनायक विशेष गाजला होता.एखाद्याचं नशीब लावणी भुलली अभंगाला अश्रूंची झाली फुले इत्यादी सामाजिक नाटकां व्यतिरिक्त शिवकालीन ऐतिहासिक नाटकातील आपल्या अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती .विशेष म्हणजे झाडीपट्टीतील उमद्या नाट्य कलावंतांना नारायण मेशराम यांच्या नावाचा त्यांची मुले दरवर्षी नारायण मेश्राम गौरव पुरस्कार देतात. हे येथे विशेष उल्लेखनीय आहे दिनांक 18 ऑक्टोबरला स्थानिक मोक्षधामावर सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले मुलगी सुना नातवंडे आप्तस्वकीय व मित्रपरिवार आहे नाट्य भूमीला दिलेल्या प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांच्या नावाचा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने द्यावा अशी मागणी नाट्य प्रेमी कडून व कलावंतांकडून होत आहे.