मत्स्यव्यवसायांच्या विकासासाठी झिंगा प्रकल्प राबविणार -खासदार प्रफुल पटेल

0
264

साकोली,दि.19ः-राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्यसभा खासदार प्रफुलभाई पटेल हे गेल्या दोन दिवसापासून आपल्या गृह जिल्ह्यात(गोंदिया-भंडारा)दौर्यावर असून यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेट देत अधिकारी व नागरिकांशी चर्चा केली.त्यातच आज सोमवारला(दि.19)खासदार पटेल यांनी साकोली तालुक्यातील चारगावं येथील मालगुजारी तलावाला भेट देत मच्छिमार बांधवांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत चर्चा करतांना मच्छिमार समाजाच्या व्यवसायाला वृध्दींगत करण्यासाठी झिंगा प्रकल्प सुरु करण्यासंदर्भात राज्यसरकारसोबत लवकरच चर्चा करण्याचे आश्वासन देत ग्रामीण विकासाला यापुढे महत्व द्यायचे असल्याचे विचार व्यक्त केले.यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार राजेन्द्र जैन,अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचे आमदार मनोहर चंद्रीकापुरे,भंडारा जिला मध्य. सहकारी बॅंक अध्यक्ष  सुनिल फुंडे, बॅंक उपाध्यक्ष सदाशिव वलथरे,सुधीरभाऊ केदार, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर,डाॅ. अविनाश काशीवर, बॅंक संचालक अजय (बाळा) हलमारे, श्याम नागोसे व मासेमारी व्यवसाय करणारे बांधव व समाजातील लोक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.जय अम्बे मत्स्य पालन सहकारी संस्था चारगांवच्या वतीने खासदार प्रफुल पटेल यांचा शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला.