
नागपूर,दि.20ः-विदर्भात मोठ्या संख्येने असलेल्या गोंड गोवारी समाजाला अनुसूचित जातीचा लाभ घेण्याबाबद उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही त्या समाजातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याने भंडारा-गोंदियाचे विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके यांनी आदिवासी उपायुक्तांची भेट आंदोलनाचा इशारा दिला.डाॅ.फुके यांच्या आंदोलनाच्या धास्तीने जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करणार्या उपायुक्तांनी जातवैधता प्रमाणपत्र वाटप करण्यास समंती दिली.
गोंडगोवारी समाजातीव विद्यार्थ्यांनी अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र करीता १२ वी विज्ञान परिक्षा पास उत्तीर्ण केल्यानंतर आदिवासी विभागाकडे सादर केले होते,मात्र ते प्रकरण निकाली न काढता आदिवासी विभागाकडेच प्रलंबित असल्याने निट मेडिकल प्रवेश परिक्षेचा निकाल लागलेला असून इंजिनिअरिंग प्रवेश परिक्षेचा निकाल सुद्धा लागल्यामुळे प्रवेशाच्यावेळी अडचण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत आ.फुके यांच्याकडे गोंडगोवारी समाजाचे शिष्टमंडळ भेटले.फुके यांनीही लगेच दखल घेत आज २०/१०/२०२० ला आदिवासी बांधवांसोबत नागपूर येथील आदिवासी जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयात जाऊन सहआयुक्त तथा उपाध्यक्ष यांना निवेदन देऊन त्वरित जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत विनंती केली.लवकर प्रमाणपत्र न दिल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देताच उपायुक्त यांनी लगेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र त्यांच्या स्वाधीन केले.उर्वरित प्रमाणपत्र लवकरच देण्यात येतील असे आश्वासन दिले.यावेळी कैलाश राऊत, अध्यक्ष आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र,हेमराज नेवारे, झेड. आर. दुधकवर, सुशील राऊत,जयदेव राऊत,माहेश्वरीताई नेवारे, मणीषाताई भोंडे,मारोतराव नेहारे,सुदर्शन चामलोट व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.