आज सालई खुर्द येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन

0
117
सालई खुर्द :- शेतकऱ्यांना उन्हाळी धानपिकासाठी बावंनथडी प्रकल्पाचे पाणी नेरला (सालई खुर्द) कालवा क्रमांक २ ला देण्यात यावे , असे आश्वासन बावनथडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडुन मिळाले नसल्याने आज तुमसर-रामटेक राज्यमार्गावर सालई खुर्द बस स्टॉप चौकात शेतकऱ्यांकडुन रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे . या आशयाचे निवेदन सहाय्यक अभियंता (श्रेणी एक) बावंनथडी पाटबंधारे उपविभाग बघेडा(तुमसर), विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, आ. राजू कारेमोरे, माजी आ. चरण वाघमारे, उपविभागीय अधिकारी महसूल नितीन सदगीर, नायब तहसिलदार घनश्याम सोनकुशरे, सहायक पोलिस निरीक्षक दीपक वानखेडे आंधळगाव यांना निवेदन देण्यात आले आहे . बावनथडी प्रकल्पात या वर्षी ९६ टक्के जलसाठा असूनही या प्रकल्पाचे अधिकारी उन्हाळी धानासाठी पाणी देण्याचे आश्वासन देण्यास टाळाटाळ करीत आहेत . यावर्षी शेती मध्ये उत्पादन भरपूर होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असताना धानाला किडरोगाच्या  प्रादुर्भावाने हाता तोंडाशी आलेला धान पीक पूर्णतः खराब झाला आहे , आधीच लागवड खर्च, खते, बी, बियाणे, व आता औषधी फवारणी याला लागणार खर्च खूप जास्त असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं संकट निर्माण झाले आहे . सालई खुर्द, पालडोंगरी, सिहरी, उसर्रा, टांगा, बपेरा,मलिदा, डोंगरगाव, रामपूर आदी परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतकरी संकटातून बाहेर येण्यासाठी उन्हाळी धान लावणार असल्याने धानपिकाला पाणी देण्यात यावे , व तसे आश्वासन देवुन जाहीर नोटीस काडून शेतकऱ्यांना सुचित करण्यात यावे , अशी मागणी निवेदनातून केली असून निवेदनावर प्रकाश खराबे, अशोक पटले, किशोर भैरम, नितीन लिल्हारे, हैशोक शरणागत, डॉ सुनील चवळे, भोलाराम पारधी, ईश्वरद्याल गिरीपुंजे, शोभाराम गिरीपुंजे, झनकलाल दमाहे, शिवदास दमाहे, अशोक अटराहे, अमोल बेलेकर, प्रदीप बंधाटे, गजानन दमाहे, महेंद्र सव्वालाखे, शैलेश लिल्हारे, गणेश दमाहे, बबन टाले, प्रदीप सरोते, गोपाल लिल्हारे, शिवदास लिल्हारे, आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत .
   ”  आंदोलन कर्त्याना नोटीस ” 
निवेदन देवुनही उन्हाळी धानपिंकासाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी देण्याचे आश्वासन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडुन मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सालई खु .येथे गुरूवारला रास्ता रोको आंदोलन आयोजित केला आहे . कोरोनाचे कारण समोर करुन   हा आंदोलन उधळून लावण्यासाठी आंधळंगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वानखेडे यांनी आंदोलन कर्त्यावर कारवाई करण्याचे नोटीस आधीच शेतकऱ्यांना दिले आहे .