
गोंदिया,दि.१३ःराष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे जिल्हा कार्यकारिणी व पक्ष संघटनेचा आढावा बैठक माजी आमदार राजेंद्र जैन, प्रदेश सचिव विनोद हरिणखेडे, जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, प्रभाकर दोनोडे यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगामी विधानसभेच्या निवडणुका पूर्ण क्षमतेने लढणार असून कार्यकर्त्यांनी आता पासुन कामाला लागावे. जिल्ह्याच्या विकासासाठी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर खासदार प्रफुल पटेल यांच्या नेत्रृत्वात पक्ष संघठन मजबूत करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवीन लोकांना पक्षाशी जोडण्याचे कार्य करावे. महायुतीचे सरकारने विद्यार्थीनिंच्या हिताचे निर्णय घेत अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण करण्यात आलेले आहे. ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना याचा लाभ मिळणार महिलांच्या व मुलींची प्रगती, आर्थिक स्वावलंबन व आत्मनिर्भर बनविण्यासाठी उचललेल्या पाहुलांचा व जनहितोपयोगी निर्णयाचा प्रचार प्रसार करावा असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
या बैठकीला सर्वश्री राजेन्द्र जैन, विनोद हरीणखेडे, प्रेमकुमार रहांगडाले, प्रभाकर दोनोडे, राजलक्ष्मी तुरकर, पूजा अखिलेश सेठ, केतन तुरकर, विशाल शेंडे, अविनाश काशीवार, यशवंत गनवीर, सुरेश हर्षे, जगदीश बावनथड़े, किरण पारधी, कुंदन कटारे, बालकृष्ण पटले, मोहन पटले, रवि पटले, कैलाश पटले, अखिलेश सेठ, मनोज ड़ोंगरे, योगेंद्र भगत, केवल बघेले, नीरज उपवंशी, घनश्याम मस्करे, सरला चिखलोंडे, अजय उमाटे, कीर्ति पटले, सुशिल हलमारे, कल्पना बहेकार, पियुष झा, सोनम मेश्राम, सुभाष यावलकर, चुन्नीलाल शहारे, रिताराम लिल्हारे, प्रभूलाल शेैंडे, अशोक शहारे, राजकुमार प्रतापगडे, विनोद कनमवार, बाबा बहेकार, कमलबापू बहेकार, कृष्णकुमार जयसवाल, योगेश कंसरे, मुनेश्वर कावळे, भोलेनाथ कापगते, योगेश पतहे, आस्तीक परशुरामकर, सतीश मोहबे, मानीक टेंभरे, प्रकाश नेवारे, सतीश कोल्हे, इंन्दल चौव्हान, आरजु मेश्राम, विजय भांडारकर, सुनिल ब्राम्हणकर, राजुभाउ मेटाले, सदाराम लाडे, गोपाल तिवारी, सूजीत अग्रवाल, दिलीप ड़ोंगरे, संदिप मिश्रा, रवि क्षिरसागर, राजेश भक्तवर्ती जयप्रकाश पटले, लोकनाथ हरीणखेडे, कुलदीप गायधने, राजेश्वर रहांगडाले, नारहरप्रसाद मस्करे, सुनील पटले, शैलेश वासनिक, बाळा हलमारे, प्रतीक पारधी, सत्यम कटरे, यश रहांगडाले, आशिष कटरे, ओम असाटी, प्रकाश गायधने, राजेश बिसेन, सोमेश रहांगडाले, भागेश बिजेवार, योगेश डोये, भागवत फरकूंडे, कपील बावनथडे, कुणाल बावनथडे, हेमराज डाहाके, करण टेकाम, पंकज चौधरी, नितीन टेंभरे, नामदेव शहारे, किशोर पारधी, प्रशांत मेश्राम, संदिप मेश्राम, चंदन गजभिये, सुरेंद्र रहांगडाले, कृष्ण्कुमार बिसेन, तिलक पटले, कविता रहांगडाले, सिमा शेडे, हर्षा राउ्त, आर के जांभूळकर, उध्दव मेहढळे, प्रमोद़ ड़ोंगरे, अमजद खान, योगेश लोणारे, घनश्याम ठाकरे, सथिर सिंग, दीलीप दुरुगकर, दानेश साखरे, धरमसिग टेकाम, रवि किसाने, धनराज पटले, रघूविर उद्के, गोवींद लिचडे, जितेंद्र बडोले, हर्ष साखरे, सुनिल कापसे, राज लाडे, प्रफूल उके, गंगाराम कापसे, मनोहर राउत, राजेश कावळे, नरेंद्र बेलगे, वामन गेडाम सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.